Thursday, September 19, 2024

कत्तलखान्यावर कोतवाली पोलीसांचा छापा: १७ गोवंशीय जनावरांची सुटका

कत्तलखान्यावर कोतवाली पोलीसांचा छापा: एकुण १७ गोवंशीय जनावरांची सुटका ३,१०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

दिनांक ०२/०८/२०२४ रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला झेंडीगेट मस्जिद क्रं २२ समोर एका बंद वाडग्यात काही गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याकरीता डांबून ठेवले आहे व आत्ता छापा टाकल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोनि प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री केली असता आरोपी नामे कादर मुसा शेख रा निजाम गल्ली कोठला अहमदनगर याच्या कबज्यात एकूण ३,१०,०००/- रु कि च्या लहान मोठ्या आकाराच्या विवीध रंगाच्या गोवंशीय जातीचे गाई, वासरे, बैल असे मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन गोवंशीय जनावरांचे योग्य प्रकारे निगा राखणे व चारा पाणी याची व्यवस्था होणे करीता त्यांना पांजर पोळ गोपालन संस्था अरणगांव व येथे सुखरुप सोडले आहे, सदर कारवाईबाबत पोकाँ/ सतिष मारुती शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं /२०२४ BNS २०२३ चे कलम २७१ सह महा पशु संरक्षण अधिनियम कलम ५ (क), ९ (अ) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवयास प्रतिबंध अधि ११ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती सो यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, सतिष भांड,गणेश धोत्रे, विशाल दळवी,पोना सलिम शेख, अविनाश वाकचौरे, पोकाँ.अमोल गाढे,अतुल काजळे, सतीश शिंदे, मपोहेकाँ तोरडमल, पोकाँ अभय कदम यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles