राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि. 15) रात्री सावेडी उपनगरातील एकविरा चौकात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने खूनी हल्ला केला होता. चत्तर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी दाखल गुन्ह्यात भाजपा नगरसेवक स्वप्निल शिंदेसह पाच जणांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. वैदवाडी), अक्षय प्रल्हाद हाके (रा. नगर), महेश नारायण कुऱ्हे (रा. सावेडी), विकी ऊर्फ सुरज राजन कांबळे (रा. नगर), अभिजित रमेश बुलाखे (रा. गजराज फॅक्टरी समोर, नगर) अशी ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नावे आहेत. शिंदे, कुऱ्हे, कांबळे, बुलाखे यांच्या विरोधात पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी काल चौघांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.