Friday, January 17, 2025

नगरमध्ये विवाहितेला सोशल मीडियावरची ओळख नडली , विवाहिता भेटण्यास गेल्यावर..

नगर -सोशल मीडियावर झालेले संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेला भेटण्यासाठी बोलविले. विवाहिता भेटण्यास गेल्यावर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना रविवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली.

याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय कटावकर (रा. भिस्तबाग) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षयसोबत फिर्यादीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. ते दोघे सोशल मीडियावर बोलत होते.

परंतु काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांनी त्याच्या सोबत बोलणे बंद केले होते. दरम्यान २० डिसेंबरला अक्षय याने फिर्यादीला फोन करून भेटायला बोलविले. भेटण्यासाठी आली नाही तर आपल्यातील सोशल मीडियावर झालेले संभाषण तुझ्या नवर्‍याला पाठवून तुझा संसार मोडून तुझे जीवन बरबाद करून टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी ७ जानेवारीला अक्षय याच्या घरी गेल्या असता अक्षयने त्यांच्या सोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles