Saturday, October 5, 2024

Ahmednagar crime News : भांडण सोडायला गेलेल्या पोलिसालाच आरोपींची मारहाण

कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना त्यांचे भांडण सोडायला गेलेल्या पोलिसालाच दोन आरोपीनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने तालुक्यातील खळबळ उडाली आहे.

तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या आरोपी लॉकपगार्ड येथे ड्यूटी नेमलेली स. फौ. संदीपान गायकवाड, पोहेकॉ सगळगिळे, पो. कॉ गुंजाळ हे कर्तव्यावर असताना येथे अरोपी बॅरेक नं. ३ मधील अरोपी किरण अर्जुन आजबे (रा. झोडगे मळा, नागरदेवळे, भिंगार जि. अ.नगर), मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (रा. गांधीनगर, कोपरगाव) हे आरोपी दीपक आत्माराम निंबाळकर याला लॉकपमध्ये मारहाण करीत करी असल्याने फिर्यादी स. फौ. यशवंत भिमराव पांडे हे त्याला बाहेर काढत असताना वरील आरोपी यांनी फीर्यादी व साक्षीदार करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपीविरुद्ध गु. रजि. नं. ४२४/२०२४ भारतीय न्यायसहिंता २०२३ चे कलम, १२९, १३२,३५२,३५१(२) (३) प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोस. इ संजय पवार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles