Monday, June 17, 2024

नगरमध्ये घरफोड्या करणारी टोळी जेरबंद… सीसीटीव्ही फुटेजवरून लागला छडा…

घरफोडी करणारी आंतरजिल्हा सराईत आरोपीची टोळी जेरबंद,
74 मि.ग्रॅम सोने व 300 ग्रॅम चांदी असे 5,38,100/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई
—————————————————————————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, श्री रखमा बालाजी सुंबे वय 57 वर्षे, अमृत कलश रेसिडेंसी, बी बिल्डींग फ्लॅट नंबर 05, बोरुडे मळा, बालीकाश्रम रोड, अहमदनगर हे दिनांक 25/05/2024 रोजी त्यांचे घरास कुलुप लावुन कामानिमीत्त बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचा कडी कोयंडा तोडुन कपाटातील 66,000/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 647/2024 भादवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या वारंवार घटना घडत असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना घरफोडी चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल, पोलीस अंमलदार संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, संतोष खैरे, प्रमोद जाधव, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेटी देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुस असलेले फुटेज संकलित करुन सदरचे फुटेज हे महाराष्ट्र राज्यामध्ये आरोपींची ओळख पटविणेकामी प्रसारित केले होते. त्यानुसार सदर फुटेजमधील एक आरोपी हा किशोर तेजराव वायाळ रा. बुलढाणा हा असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस पथक सदर आरोपीचा शोध घेत असतांना दिनांक 03/06/2024 रोजी सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा चोरी करण्यासाठी आलेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने पाईपलाईन रोडते वडगांव गुप्ता गावाकडे जाणारे रोडवरील नातु बागेजवळ सापळा लावुन आरोपी नामे 1) किशोर तेजराव वायाळ वय 42 वर्षे, रा. मेरा बु ाा, ता. चिखली, जि. बुलढाणा, 2) गोरख रघुनाथ खळेकर वय 37 वर्षे, रा. शिरसवाडी, ता. जि. जालना, 3) विष्णु हरिश्चंद्र हिंगे वय 32 वर्षे, रा. चंदनझिरा कॉलनी, जालना, ता. जि. जालना यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार रुद्राक्ष पवार पुर्ण नांव माहिती नाही. रा. लाखनवाडा, ता. खामगांव, जि. बुलढाणा (फरार) याचेसोबत अहमदनगर, नेवासा, चाळीसगांव, जि. जळगांव, पैठण, जि. छ. संभाजीनगर या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आरोपींकडुन 74 मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, गुन्हा करतेवेळी वापरलेली कटावणी असा एकुण 5,38,100/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडुन अहमदनगर, जळगांव, व छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे 07 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 647/2024 भादवि कलम 454, 380
2 तोफखाना 602/2024 भादवि कलम 454, 380
3 नेवासा 508/2024 भादवि कलम 454, 457, 380
4 नेवासा 514/2024 भादवि कलम 454, 380
5 नेवासा 518/2024 भादवि कलम 454, 380
6 चाळीसगांव, जि. जळगांव 216/2024 भादवि कलम 454, 380
7 पैठण, जि. छ. संभाजीनगर 180/2024 भादवि कलम 454, 457, 380

आरोपी नामे किशोर तेजराव वायाळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द जालना, बुलढाणा, अकोला, जळगांव, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घरफोडीचे एकुण 50 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे विष्णु हरिशचंद्र हिंगे याचेविरुध्द छ. संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये फसवणुक, जबरी चोरीचे एकुण 06 गुन्हे, आरोपी नामे गोरख रघुनाथ खळेकर याचेविरुध्द जालना, बीड, छ. संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोक्का, दरोडा, जबरी चोरी, चोरी, फसवणुक व घरफोडीचे एकुण 18 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदर आरोपींकडुन आणखी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग, मा. श्री सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles