Tuesday, April 23, 2024

Ahmednagar crime…खोलीचे भाडे न दिल्याने सहकाऱ्याचा केला खून…

शिर्डी – तुमचे भाडे न दिल्याने रूममेटनेच एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीत घडली आहे. शिर्डीतील देशमुख चारी इथल्या वसाहतीत भाडोत्री राहत होते. इथं ७४ वर्षीय श्रीनिवास शेट्टी यांचा रुममेटनेच खून केल्याने खळबळ उडाली आहे. रुमचे भाडे न दिल्याने हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी धर्मेंद्र मेहता याला अटक केली आहे.

शिर्डी शेजारच्या देशमुख चारी येथील वसाहतीत श्रीनिवास शेट्टी आणि धर्मेंद्र मेहता हे भाड्याने रूम घेऊन राहत होते. श्रीनिवास शेट्टी यांनी भाडे न दिल्याने धर्मेंद्र मेहताने मारहाण केली. त्याने श्रीनिवास शेट्टींचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या श्रीनिवास शेट्टी यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles