अहमदनगर- भर बाजारपेठेत तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रशांत काळे (रा. मंगलगेट, नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नगर शहर व परिसरात तरुणांवर होणारे हल्ले वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मंगलगेट परिसरात दोन गटात राडा झाला होता.
हा प्रकार ताजा असतांना गुरुवारी पुन्हा प्रशांत काळे या तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोकळ्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णातयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारच्या सुमारास तरुणावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. टोकळ्याने एका गाडीचे नुकसानही केले आहे. तसेच टोळक्याने हातात दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही बाजारपेठेत केला.
तरुणावर हल्ला करताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यानुसार कोतवाली पोलिस हल्लेखोरांचा तपास कोतवाली करीत आहेत. दरम्यान, भर दिवसा हातात दांडके घेऊन दहशत निर्माण करणार्या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरकरांकडून होत आहे.