Wednesday, April 17, 2024

शेतकऱ्यांना खुशखबर! जिल्हा बँकेचा मोठा निर्णय…व्याज परत करणार

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक वि.का. सेवा सहकारी संस्थांनी ज्या पिक कर्जदार सभासदांकडील नियमित कर्ज ३ लाखापर्यंतचे कर्जावरील वसुल केलेले व्याज कर्जदार शेतकरी सभासदांना परत करणार असल्याची माहीती बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

शासनाच्या सहकार खात्याच्या दिनांक १४ मार्च २०२४ व दि.२७ मार्च २०२४ परिपत्रकानुसार शेतकरी सभासदाकडून पिक कर्जावरील रक्कम ३ लाखापर्यंतच्या व्याज वसुल न करण्याबाबतच्या सुचना सर्व जिल्हा बँकांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार बँकेने दि. २८ मार्च २०२४ रोजीचे परिपत्रकानुसार जिल्हयातील सर्व सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याज वसुल न करणेबाबतच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापि, प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांनी त्यांना सदरहू परिपत्रक मिळण्यापुर्वी नियमित पिक कर्ज परतफेड करणार्‍या शेतकरी सभासदांकडून पिक कर्जावरील व्याज वसुल केलेले होते.

याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत वृत्तपत्रांमध्ये व्याज वसुल न करण्यासंदर्भाने बातमी प्रसिध्द केलेली होती. तसेच पिक कर्जावरील व्याज वसुल केलेल्या सर्व संस्थांमार्फत सभासद निहाय माहिती मागविणेबाबत शाखा व सोसायटयांना दिनांक १ एप्रिल २०२४ रोजीचे परिपत्रकानुसार सुचना देखील दिलेल्या आहेत. सदरहू परिपत्रकानुसार माहीती संकलीत करण्याचे काम चालु असुन त्यानुसार वसूल केलेले व्याज लवकरच संबंधित कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्यात येणार आहेत.

याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दि. १५ एप्रिल २०२४ रोजी बँकेचे संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी सभासदांनी दि.३१ मार्च २०२४ पर्यंत विहीत मुदतीत पिक कर्ज नियमित भरणा केलेला आहे अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमानुसार खरीप पिक कर्ज त्वरीत वितरीत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यापुढे देखील जे शेतकरी सभासद मागील पिक कर्जाची परतफेड करतील अशा सभासदांना देखील त्वरीत कर्ज वितरीत करण्यात येईल. अशी माहिती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles