Wednesday, June 25, 2025

उपसरपंचासह कुटुंबाला मारहाण मारहाणीत पती पत्नी गंभीर जखमी, नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर-वाहनाचा कट मारल्याच्या रागातून दोघा जणांत झालेले वाद मिटविणे डोंगरगण (ता. नगर) येथील उपसरपंचाच्या अंगलट आले. आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने उपसरपंचासह त्यांच्या पत्नी व आईला मारहाण केली. मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपसरपंच संतोष भागुजी पटारे (वय ३२) यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. राहुरी), देविदास बाबासाहेब आढाव, गौरव देविदास आढाव (दोघे रा. डोंगरगण), विशाल सोनवणे (पूर्ण नाव नाही, रा. हिंगणगाव ता. नगर) व इतर अनोळखी चार ते पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२७ एप्रिल रोजी डोंगरगण फाट्यावर अक्षय बाबासाहेब गोपाळे व जयदीप बाळासाहेब मते यांच्यात वाहनाचा कट मारण्याच्या कारणातून वाद झाले होते. ते उपसरपंच पटारे व इतरांनी मिटविले होते. दरम्यान २८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता पटारे हे गावातील बसस्थानकावर असताना देविदास आढाव व इतर चार ते पाच जणांनी ‘तुला व घरच्यांना दाखवतो तू काल आम्हाला न्याय नाही दिला’, अशी धमकी दिली होती. त्याच दिवशी दुपारी आढाव याने पटारे यांच्या घरी जाऊन पत्नी केशर यांना धमकी दिली होती.

२९ एप्रिल रोजी पटारे व त्यांचे कुटुंब घरासमोरील पटांगणात झोपलेले असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास अक्षय गोपाळे व इतर तेथे आले. त्यांनी पटारे दाम्पत्याला मारहाण करून जखमी केले. पटारे यांची आई भामाबाई यांना देखील मारहाण करण्यात आली. घरासकट पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. केशर यांच्या गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, पटारे यांच्या खिशातील १५ हजाराची रोकड धमकी देवून हिसकावून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles