अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीची जिल्ह्याची 121 पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, राज्य सहसचिव सागर पाटील, युवक आघाडीचे राज्य संघटक प्रदीप थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहर कार्यकारिणीत 44 जणांना नेमणुका देण्यात आल्या. तर यावेळी युवकांनी आप मध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी राज्य पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात पक्षाची ध्येय धोरण स्पष्ट केले.
मुकुंद किर्दत म्हणाले की, सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणात सर्वसामान्य जनता भरडली जात असताना आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सर्वोत्तम पर्याय मिळणार आहे. सर्वसामान्यांचा विकास केंद्रबिंदू ठेवून आपने दिल्ली व पंजाबमध्ये बदल करुन दाखविला आहे. हा पॅटर्न संपूर्ण भारतात घेवून जाण्यासाठी आप प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिव प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, जिल्ह्यात आपने राजकीय अस्तित्व निर्माण केले. पक्षाच्या विचारधारेशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला जात असून, विविध क्षेत्रातील चारित्र्यवान व्यक्तींचा देखील समावेश आहे. आपच्या माध्यमातून घराणेशाही व दंडेलशाही मोडित काढून सर्वसामान्यांच्या हातात सत्तेची सूत्रे देण्यासाठी आप कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष केकाण यांनी परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाचे ध्येय, धोरण, विचारधारा व पक्षाची वाटचाल याबद्दल मार्गदर्शन केले.
आदिनाथ गिऱ्हे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि: प्रकाश फराटे यांनी केले. आभार ॲड. महेश शिंदे यांनी मानले. यावेळी दादासाहेब बोडखे, संतोष नवलखा, ॲड. सादिक शिलेदार, भरत खाकाळ, तनिज शेख आदी उपस्थित होते.
आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी- राजेंद्र नागवडे, शरद शिंदे, महासचिव- प्रकाश फराटे, संघटन मंत्री- सुभाष केकान, फिरोज शेख, बजरंग सरडे, प्रवक्ते- ॲड. महेश शिंदे, सचिव- प्रा. अशोक डोंगरे, कोषाध्यक्ष- कुमार भोंडे, ऑफिस इन्चार्ज नामदेव ढाकणे, महिला आघाडी प्रमुख- ॲड. सविता नगरे, जयश्री शिंदे, एकता भरताल, रंजना बोडखे, शहर महिला अध्यक्ष- ॲड. विद्या शिंदे, शिक्षक आघाडी प्रमुख- प्रदीप बहिर, लीगल सेल प्रमुख- ॲड. निलेश शेलार, ॲड. तुषार साळवे, सहसंघटन मंत्री- बाळासाहेब साळवे, मल्हारी गुंजाळ, तानाजी कांबळे, अण्णा बागल, प्रवीण मेमाणे, देवदत्त साळवे, किरण भालेराव, वसंत धांडे, महेश सटाले, प्रवीण जमदाडे आदींसह 121 जणांची जम्बो कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे.
नगर जिल्ह्याची आम आदमी पार्टीची 121 पदाधिकाऱ्यांची जंम्बो कार्यकारिणी जाहीर
- Advertisement -