Wednesday, April 17, 2024

अहमदनगर जिल्हा बँकेने घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालु वर्षात रू.२९९५ कोटीचे कर्ज वाटप केलेले असुन चालु वर्षात आज अखेर ४६७४ कोटीचे पिक वसुलास पात्र असुन ३८३३ कोटीचे येणेबाकी कर्ज आहे. शासनाने दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून त्यांना अनुज्ञेय प्रोत्साहनपर व्याज अनुदान रक्कम वजा करून परत फेडीची रक्कम वसुल करणेबाबत दि.२७ मार्च २०२४ च्या सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी कळविल्यानुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चालू अथकीत वसुलास पात्र पिक कर्ज वसुलीबाबत फक्त मुद्दल कर्ज वसुल करणेबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार याबाबत शाखांना सविस्तर सुचना कळविल्या असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

सद्यस्थितीत गतसालाच्या तुलनेत बँकेचा वसुल कमी प्रमाणात होत असुन शासनाकडुन शेतक-यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदान देणे कामी योजने अंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून बँकेला सन २०१९-२०२० ते आजपर्यंत १७६ कोटीचे व्याज परतावा अदयापही जमा झालेला नाही तसेच महाराष्ट्र शासनाकडुन डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत परतावा योजने अंतर्गत कर्जदार शेतक-यांना देण्यात येणारे व्याज सवलत सन २०२१ पासुनची ४०१५९९ सभासदांचे ९९ कोटी ७५ लाखाचे व्याज शासनाकडुन अदयापही जमा झालेला नाही.

बँक ठेवीदाराच्या पैशातुनच सर्व प्रकारचे कर्ज वाटप करीत असल्याने व बँकेस ठेवीदारांना मात्र त्यांच्या ठेवी व ठेवीवरील व्याज नियमित द्यावे लागते. सदरच्या शासनाकडून व्याज परतावा वेळेत न आल्याने बँकेवर व प्राथ.वि.का.सेवा संस्थावर त्याचा विपरीत परिणाम होत असुन शासनाने वेळेत व्याज परतावे जमा दिल्यास बँक व वि.का.सेवा संस्थांची आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत बँक शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहे अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles