अहमदनगर (प्रतिनिधी)- बँकेचे अध्यक्ष नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराप्रमाणे जिल्हा बँकेत मनमानीपणे कारभार चालवत आहेत. बँकेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळेच 107 कोटी रुपये खर्चाच्या संगणक प्रणाली खरेदीच्या विरोधात संचालकांनी एकत्र येऊन हा विषय स्थगित ठेवण्याचा योग्य निर्णय घेतला. जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला आता सुरुवात केली जाणार असल्याची चर्चा ऐकू येते आहे. परंतु ही नोकर भरती बँकेने करण्याऐवजी राज्य सरकारमार्फत व्हावी. अन्यथा नोकर भरतीत भ्रष्टाचार, गैरव्यवहार होण्याची व लायक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय ज्योत निष्ठेची-लोकशाहीच्या संरक्षणाची हे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारे शिबिर, 3 व 4 जानेवारी रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. तनपुरे बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे आदी यावेळी उपस्थित होते. विकसित भारतच्या नावाखाली मोदी सरकारचा रथ गावागावात सध्या फिरवला जात आहे. परंतु घरकुल योजना 2022 मध्येच पूर्ण केली जाणार होती, ती अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्याच्या लाभार्थींना अनुदानही मिळालेले नाही. शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. दूध उत्पादक नाराज आहेत. बेरोजगारीमुळे युवक नाराज आहेत. महागाईचा आगडोंब निर्माण झाला आहे, याकडे दुर्लक्ष करत रथयात्रा काढली जात आहे, अशी टीका आ. तनपुरे यांनी यावेळी केली. बँकेचे अध्यक्ष नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराप्रमाणे मनमानी कारभार चालवत आहेत. बँकेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळेच 107 कोटी रुपये खर्चाच्या संगणक प्रणाली खरेदीच्या विरोधात संचालकांनी एकत्र येऊन हा विषय स्थगित ठेवण्याचा योग्य निर्णय घेतला. यापूर्वी वाहन खरेदीत उधळपट्टी झाली असल्याचा आरोप आ. तनपुरे यांनी यावेळी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, शिबिरामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. जिल्हा शरद पवार यांच्या विचाराबरोबर कायम आहे, हे शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिले जाईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जिल्ह्यात सर्वाधिक जागा मिळाल्या. आगामी निवडणुकातूनही हेच चित्र कायम राहील.
अहमदनगर जिल्हा बँकेची भरती राज्य सरकार मार्फत व्हावी,आ. प्राजक्त तनपुरे
- Advertisement -