जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजीराव कर्डिले यांचे आवाहन
अहमदनगर – जिल्हा सहकारी बँकेची भरती प्रक्रिया परीक्षेच्या रूपाने आज पासून पुणे या ठिकाणी सुरू झाली आहे .बँकेची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठीच पुण्यासारख्या ठिकाणी ऑनलाइन सिस्टीमने ही प्रक्रिया पूर्ण होणार असून स्वयंघोषित एजंट पासून परीक्षार्थी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सावध राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हा बँकेसाठी गुरुवार पासून पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली असून ७०० जागांसाठी सुमारे २८ हजार अर्ज आलेले आहेत. आपल्या मुलाला अथवा मुलीला जवळच्या नातेवाईकाला या भरतीच्या माध्यमातून नौकरी मिळावी म्हणून गेल्या काही दिवसापासून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्याकडे कार्यकर्ते पदाधिकारी मित्र परिवार नातेवाईक यांची मोठी वर्दळ वाढल्याने बँकेच्या पदाधिकाऱ्यांची देखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठोस भूमिका घेत भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर भूमिकाच बँकेच्या वतीने मांडली असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी तरुण वर्ग सर्वांनीच प्रामाणिकपणे मोठे सहकार्य केले आणि म्हणूनच मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहेच परंतु जिल्हा सहकारी बँक आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचा पारदर्शक कारभार सुरू आहे त्यामुळे होणारी भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी अभ्यासू हुशार गुणवंत विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून न्याय मिळावा हिच माझी प्रामाणिक इच्छा आहे.
तसेच उमेदवारांना परिक्षा देण्यासाठी पुण्यात जावा लागणार आहे कारण अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या उमेदवारांची परिक्षा घेण्याची सर्व तांत्रिक सुविधा उपलब्ध नाहीत. पाहिजे तेवढा परिक्षा घेण्यासाठी कम्प्युटर उपलब्ध नाहीत. त्यांना इथे परिक्षा घेतल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की लाईट, इंटरनेट कनेक्टिव्हीटी इत्यादी सुविधा पुरेश्या प्रमाणात न मिळाल्यास अडचणी झाल्या असत्या असे कंपनीचे म्हणणे होते, त्यात तथ्य आहे. त्यामुळे या सर्व अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पुण्यात परंतु नगरच्या जवळ परिक्षा घेण्याचे नियोजन कंपनी मार्फत केले गेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होणार आहे. ९, १०. ११, १२, १३ व १९ जानेवारीपर्यंत ही परिक्षा पार पाडणार आहे
ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्या निकषास पात्र सर्व नियम अटी पुर्ण करणार्या सहा कंपन्यांचा पॅनल तयार करून बँकेस कळविला त्यानुसार बँकेने रितसर शासनाचे मार्गदर्शक सूचनानुसार कोटेशन मागवून त्यातील एका कंपनीला या भरती प्रक्रियेचे कामकाज देण्यात आले. नगर येथे भरती प्रक्रिया पूर्ण करायची म्हटले असते तर शनिवार-रविवार दोनच दिवस शाळांना सुट्टी असतात अशावेळी भरती प्रक्रिया करावी लागली असती त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील अनेक दिवस सुरू राहिली असती. ज्या शिक्षण संस्था उपलब्ध आहेत त्यातील बऱ्याचशा शिक्षण संस्था बँकेच्या संचालक मंडळाशी सलग्न आहेत. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी त्या शिक्षण संस्थेत भरती प्रक्रिया झाली असती तर गैरसमज वाढले असते.
तसेच भरती प्रक्रियेच्या ठिकाणी लाईट जनरेटर सुरक्षा सर्व व्यवस्था वेळेत उपलब्ध असणे देखील महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये बैठकीसह सर्व व्यवस्था त्या ठिकाणी संबंधित कंपनीने केलेली आहे. हुशार अभ्यासू गुणवंत विद्यार्थ्यांना निश्चित पणे या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत बँक भरती प्रक्रियेच्या नावाखाली काही स्वयंघोषित एजंट देखील तयार होतील ठराविक भाव फुटला असे कर्डिले यांनी सांगून त्यांनी पुढे सांगितले की, परीक्षार्थी विद्यार्थी अथवा त्यांच्या नातेवाईकांशी जवळीक साधून त्यांची फसवणूक करू शकतात अशा स्वयंघोषित एजंटापासून परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी सावध राहावे.
भरती प्रक्रियेमध्ये कुठल्या प्रकारची वशीलेबाजी होणार नसुन आर्थिक देवाण-घेवाण कोणाशी करू नये असे आवाहन देखील जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी यानिमित्ताने केले आहे. त्यांनी शासनाकडे या बाबत मागणी करताना जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेतून बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांना भरती प्रक्रियेपासून चार हात बाजूला ठेवावे. विनाकारण संचालक मंडळाला कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नको अशा स्वरूपाची देखील मागणी बँक संचालक मंडळाच्या वतीने सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना पुणे येथे झालेल्या बैठकीच्या वेळी केलेली आहे. बँकेचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे, बँकेची भरती प्रक्रिया देखील पारदर्शकपणे व्हावी हा एकमेव प्रामाणिकपणे बँकेचा या मागचा हेतू आहे
मुलाखतीचे पाच गुण देण्यासाठी मुलाखत समिति असणार आहे त्यामध्ये संचालकांचा समावेश देखील नाही. सदर समितीमध्ये सहकार खाते, एम्प्लॉयमेंट, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प इत्यादि विभागाचे अधिकारी तसेच बँकेचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी हे असणार आहेत व ते गुणदान करणार आहे. त्याच प्रमाणे पाच गुण हे उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रते नुसारचे गुण कशाप्रकारे मिळणार आहे हे देखील जाहिरीतीत स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सदर समितीमध्ये चेअरमन म्हणून माझा देखील समावेश नको अशी प्रामाणिक भावना आम्ही सहकार मंत्र्यांकडे व्यक्त केली असल्याचे देखील आमदार कर्डिले यांनी यानिमित्ताने सांगितले.
Bandhan Bank employee
Experience