अहमदनगर जिल्हा सहकारी बँक कोणत्याही क्षणी संपुष्टात येवू शकते.ॲड. प्रतापराव ढाकणे
केदारेश्वर च्या ३५ व्या वार्षीक सर्व साधारण सभेत ढाकणे यांचा आरोप
शेवगाव बाळासाहेब खेडकर
प्रतिनिधी आशिया खंडात सर्वात अग्रेसर असणारी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूठभर कारखानदारीमुळे अडचणीत आली असुन कोणत्याही क्षणी संपुष्टात येवु शकते असा आरोप ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी केला आहे
शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न पार पडली
या सभेत सभासदांना मार्गदर्शन करतांना ॲड. ढाकणे म्हणाले अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे. या बँकेची अवस्था आज काय आहे हे लवकरच जनतेला कळेल ही बँक जिल्ह्यातील मुठभर चार-पाच कारखानदारांची नाही. ही बँक बुडाली तर शेतकर्यांना कर्ज देणाऱ्या सोसायट्या अडचणीत येतील आणी जिल्ह्यातील शेतकरी डबघाईला येतील. कोणत्याही क्षणी अहमदनगर जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडू शकते अशी बँकेची आज अवस्था निर्माण झाली आहे.
केदारेश्वर चा जन्म होत असताना अनेकांच्या नजरा लागल्या नंतर सुरु झाल्यावर चोहोबाजुंनी सातत्याने आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरीही आलेल्या संकटावर मात करून स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांनी कारखाना उभा करून यशस्वीपणे चालवला सहा वर्ष शेतकऱ्यांचे , कामगारांचे ऊसतोड मजुरांचे आणा वाहतुकदारांचे पैसे वेळेवर दिले आहे काही अडचण आली आहे ती थोड्याच दिवसात सुटणार असल्याचे सांगितले आहे
केदारेश्वर ची निर्मिती करतांना सामान्य मानसांना वंचितांना न्याय मिळवुन देण्यासाठी झाली आहे. शेकडो वर्षापासुन मानव जातीचा इतिहास हा वर्ग संघर्षाच्या लढयाचा आहे आहिरे आणि नाहीरे वर्गाचा आहे. आणी म्हणुन नाहीरे वर्गाला सोबत घेवुन गरिब मानसांना मोठ करण्याचा स्वर्गीय ढाकणे साहेबांचा वारसा आपण पुढे नेत आहोत.
पक्षीय राजकारणात जरूर त्रास द्या पण केदारेश्वर ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे त्यामध्ये त्रास देवू नका अशी विनंती केली जिल्ह्यातील इतर कारखान्याकडे ५०० कोटीच्या पुढे कर्ज आहे
हा कारखाना लवकरच कर्जमुक्त करून सभासदांना लाभांश देण्याचा मानस आहे, कोणत्याही परिस्थितीत राजकीय लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकुच पण लढाईसाठी खंभिर पाठबळ द्यावे असे अहावन केले
मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वीनकुमार घोळवे यांनी चालू गळीत हंगामाच्या नियोजन विषयी माहिती देवुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाऊसाहेब पोटभरे, सर्जेराव दहिफळे यांची भाषणे झाली.
चेअरमन ऋषीकेश ढाकणे यांनी अहवाल वाचन केले तर नोटीस वाचन कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी केले.
सुत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार संचालक डॉ. प्रकाश घनवट यांनी मानले. यावेळी संचालक, अधिकारी, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते