Wednesday, February 28, 2024

जिल्हा सहकारी बॅंकेने पतसंस्थांना कॅश‌ क्रेडिट सुविधा द्यावी,सहकार मंत्र्यांना निवेदन

पारनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी प्रशांत गायकवाड व शिष्टमंडळाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी, आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड व शिष्टमंडळाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन केली.शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक सीताराम गायकर, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र ( दादा ) नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक गैरव्यवहार व अनियमित कारभारामुळे पारनेर तालुक्यातील दोन पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.त्यामुळे पतसंस्था क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याचा फटका भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या पतसंस्थांना बसला
आहे.त्यामुळे तालुक्यात आर्थिक कोंडी निर्माण झाली असून ही कोंडी फोडण्यासाठी व या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सुस्थितीतील पतसंस्थांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत कॅश क्रेडिट तसेच इतर आर्थिक सुविधा देण्याची परवानगी कायद्याच्या अधीन राहून राज्यात सहकार विभागात धोरणात्मक काही बदल करूनदेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तालुक्यातील पतसंस्थाबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने काही समाजकंटकांसह काही राजकीय मंडळींकडून राजकीय हेतू डोळ्या समोर ठेवून या गोष्टीला खत पाणी घालून सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे तसे प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सहकार चळवळीला,पतसंस्था चालकांना,गोरगरीब जनतेला, व ठेवीदारांना विश्वास देण्यासाठी आज मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील याची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून यातून मार्ग काढण्यासाठी निवेदन देऊन जिल्हा बँकेमार्फत सभासद पतसंस्थांना कॅश क्रेडिट(cc) तसेच त्यांचे बॅलन्स शीट पाहून पूर्ण कायदेशीर खात्री केल्यानंतर काही ठराविक पतसंस्थेंना जिल्हा बँक एक” पालकत्व” सहकारी संस्था म्हणून काही बँकेमार्फत कशी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने शासन दरबारी वरिष्ठ सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच मा. आयुक्त सहकार ,पुणे यांच्याशी समक्ष चर्चा करून यामध्ये काही मार्ग सहकार चळवळ टिकवण्याच्या व सामान्य ठेवीदारांचे आर्थिक नुकसान होऊ नये या दृष्टीने मा. सहकार मंत्री यांनी मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

प्रशांत तू जिल्हा सहकारी बँक व मजूर संस्थाचा प्रतिनिधी आहेस.
सहकारी संस्था अधिक बळकटीकरण होण्याच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घ्यावे.या शिबिरासाठी मी स्वतः उपस्थित राहिल.अशी सूचना सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी प्रशांत गायकवाड यांना केली.यावेळी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांची माहिती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी प्रशांत गायकवाड यांच्याकडून घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles