Thursday, March 27, 2025

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई…

नगर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात दोन लोकसभेचे मतदार संघ आहेत. एकूण मतदानाची संख्या 36 लाख 35 हजार 366 एवढी आहे. त्याचप्रमाणे यंदा ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा पुढे आहे, असे नगर जिल्ह्यामध्ये 59 हजार 975 मतदार आहेत. या मतदारांना घरी सुद्धा मतदान करता येईल, अशी यावेळी नियोजन केले आहे. नगर जिल्हा करता एकूण 3734 मतदान केंद्र असून प्रत्येकी पाच कर्मचारी व एक पोलीस कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांना कोणती प्रकारची माहिती लागत असल्यास त्यांनी 1950 या टोल फ्री क्रमांक वरुन त्यांना माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी दिली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार एकूण मतदान केंद्राच्या 50% केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून नगर जिल्ह्यामध्ये 3734 मतदान केंद्रापैकी 1867 मतदान केंद्राचे वेब कास्टिंग तयार करण्यात येणार आहे.

वय 100 पेक्षा जास्त असलेले 1899 जण –
नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचे वय वर्ष 100 पेक्षा जास्त आहे, असे मतदार 1899 आहे. तर 110 वयाच्या पेक्षा जास्त असलेले दोन मतदार या जिल्ह्यामध्ये आहेत. यावेळेस तर नवं मतदारांची यावेळेस 2 लाख 13 हजार 920 नोंदणी झालेली आहे.त्यात नवीन 46 हजार 539 मतदार आहे.

नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्था बिघडू, नये याकरता पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी एकूण 7 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles