Tuesday, May 28, 2024

अहमदनगरमधील दुर्देवी घटना; एका मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही दुर्देवी घटना घडली आहे. काल गुढी पाडव्याच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली. घराजवळच्या विहीरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती. आधी एक जण उतरला, तो बुडाला. मग त्याला वाचवण्यासाठी उतरलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला.

घरातील एक मांजर या विहीरीत पडली होती. शेण टाकण्यासाठी या विहीरीचा वापर होत होता. मांजर विहीरीत पडली म्हणून तिला वाचवण्यासाठी एक जण विहीरीत उतरला होता. टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी या विहीरीचा वापर सुरु होता.विहीरीमध्ये पाणी नव्हतं. शेण आणि अन्य टाकाऊ पदार्थ साचून विहिरील विषारी बायोगॅस तयार झाला होता. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रशासनाकडे यंत्रणा नसल्याने मदतकार्य उशिराने सुरु झालं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles