शिक्षक विकास मंडळाच्या विश्वस्तपदी सलीमखान पठाण
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख संस्था असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी पदावर विश्वस्त म्हणून शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गुरुमाऊली मंडळाचे नेते सलीमखान पठाण यांची एकमताने निवड करण्यात आली.शिक्षक बँक व विकास मंडळाची निवडणूक झाल्यानंतर गेली दोन वर्षे हे पद रिक्त होते.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली सदिच्छा मंडळ,ऐक्य मंडळ,शिक्षक भारती, एकल शिक्षक मंच, परिवर्तन मंडळ,महिला आघाडी यांची संयुक्त सभा काल शिक्षक बँकेच्या भा दा पाटील सभागृहात पार पडली त्यावेळी ही निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष अर्जुन शिरसाठ होते.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे,दत्ता पाटील कुलट, गोकुळ कळमकर, राजकुमार साळवे,सुरेश निवडूंगे, बँकेचे माजी चेअरमन संतोष दुसुंगे,राजू राहणे,आबा दळवी,बाळासाहेब कदम, राजू सदगीर,राजेंद्र निमसे,कल्याण लवांडे, राजेंद्र ठोकळ,
रामेश्वर चोपडे,
बाळासाहेब कापसे,रविकिरण साळवे,मिनीनाथ देवकर,शिक्षक बँकेचे संचालक संदीप मोटे, महेश भणभणे, बाळासाहेब तापकीर, अण्णासाहेब आभाळे, कैलास सारोकते,बाळासाहेब सरोदे, गोरक्षनाथ विटनोर,कल्याण लवांडे,शिवाजी कराड,कारभारी बाबर, सूर्यकांत काळे, शशिकांत जेजुरकर, योगेश वाघमारे, कैलास सहाणे, एकनाथ दादा चव्हाण, ना चि शिंदे, सुयोग पवार, जयेश गायकवाड, चंद्रकांत मोरे,राजेश बनकर, रामकृष्ण जगताप, सचिन शिंदे, विकास मंडळाचे विश्वस्त विलास गवळी, शेंडगे, संतोष मगर, आंबेकर आदींसह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सलीमखान पठाण यांनी शिक्षक बँकेचे चेअरमन,नगरपालिका जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष, शिक्षक बँक शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील समस्त सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विकास मंडळाच्या विश्वस्त पदी सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी या पदसिद्ध पदावर ही निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये गुरुमाऊली सदिच्छा मंडळ तसेच ऐक्य मंडळ शिक्षक भारती एकल मंच परिवर्तन मंच आघाडी शिक्षक बँक व विकास मंडळामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहे. विकास मंडळाच्या विश्वस्त पदी आपली निवड करून जिल्हा गुरुमाऊली सदिच्छा मंडळांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करू,जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या विकास मंडळाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असेही पठाण यांनी सांगितले.
आमदार सत्यजित तांबे यांनी केला सत्कार
श्री सलीमखान पठाण यांची अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे यांनी पठाण यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार केला.शिक्षक विकास मंडळ हे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची एक चांगली सामाजिक संस्था असून आपल्या रूपाने त्या ठिकाणी चांगले काम होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना नेते संजय छल्लारे, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नजीरभाई शेख, रज्जाकभाई पठाण न पा मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन शिंदे,माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सय्यद जाकीर हुसेन सर,किशोर शिंदे,मुदस्सर मुस्ताक शेख,अरबाज पठाण,शोएब पठाण, कामरान पठाण,अमन पठाण आदि उपस्थित होते.