अशैक्षणिक कामाच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करणार : बापूसाहेब तांबे
गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष दुसुंगे यांची तर कार्यकारी अध्यक्षपदी आबासाहेब दळवी (पारनेर) यांची निवड.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, राज्य संघाचे नेते दत्ता पाटील कुलट, विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण साळवे , राज्य उपाध्यक्ष नवनाथ तोडमल , राज्य संघटक संतोष भोपे , राज्यसंघ सदस्य सुभाष खेडकर, जिल्हाध्यक्ष बबन दादा गाडेकर, कार्यकारी अध्यक्ष नारायण पिसे,
संघ उच्चाधिकार समितीचे कार्यकारी अध्यक्ष बाबाजी डुकरे पाटील, सल्लागार समितीचे अध्यक्ष भास्करराव कराळे, मा. चेअरमन संदीप मोटे पाटील ,रामेश्वर चोपडे, प्रकाश नांगरे, बाळासाहेब कापसे, बाबा आव्हाड, विठ्ठल काळे, विठ्ठल काकडे, डी.एम. शिंदे, पोपट सूर्यवंशी, पांडुरंग काळे, सुयोग पवार, राजेंद्र ठोकळ, सुनील पवळे , संचालक कारभारी बाबर, महेश भनभणे, बाळासाहेब तापकीर, गोरक्षनाथ विटनोर, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी, उपाध्यक्ष नवनाथ दिवटे, सचिव संतोष आंबेकर विश्वस्त प्रल्हाद भालेकर, मुकुंद सातपुते, दिलीप गंभीरे, संतोष मगर, कैलास वाकचौरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
राज्य नेते दत्ता पाटील कुलट यांनी शिक्षक संघ व गुरुमाऊली सदिच्छा मंडळातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वानुमते जाहीर केल्या. गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्षपदी श्री संतोष दूसुंगे यांची तर कार्यकारी अध्यक्ष पदी पारनेरचे श्री आबासाहेब दळवी यांची निवड करण्यात आली. शिक्षक संघाच्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र कुदनर (संगमनेर)तर मंडळाच्या उच्चाधिकार समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी भास्करराव दराडे (पाथर्डी) यांची निवड करण्यात आली. गुरुमाऊली-सदिच्छा मंडळाच्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद भाऊ सुद्रिक यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना शिक्षक नेते बापूसाहेब तांबे म्हणाले की, सर्वांशी विचारविनिमय करून सर्वसमावेशक निवडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी संघ व मंडळाच्या भरभराटीसाठी संपूर्ण योगदान द्यावे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा.
सर्वांशी चर्चा करून संघटनेच्या पुढील ध्येयधोरणाविषयी निर्णय घेण्यात येईल. शासनाकडून एका मागोमाग एक येणारे आदेश, उपक्रम व प्रकल्प यामुळे शिक्षकांचे मानसिक स्वास्थ बिघडले असून शिक्षक ताणतणावात जगत आहेत. उपक्रमांच्या नावाखाली शिक्षक विद्यार्थ्यांपासून दूर जात आहे. शिक्षकांचा संपूर्ण वेळ उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात जात आहे. हे जिल्हा परिषद शाळा व तेथील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शाळाबाह्य कामाच्या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी जाहीर केले.
नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यां शिक्षकांना भेडसावत असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. शासनाच्या व प्रशासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणामुळे शिक्षकांना काम करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थी हेच दैवत माणून वाडी-वस्तीवर, खेडापाड्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना विविध अशैक्षणिक व शाळाबाह्य कामाला जुंपून शासन व प्रशासनाला मराठी शाळा बंद करायचे आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर घेऊन जाणाऱ्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी निषेध करण्यात आला.
आम्हाला शिकू द्या अशी आर्त हाक सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिली.
गोकुळ कळमकर म्हणाले की, संघटनेचे काम अविरतपणे सुरू ठेवणे आवश्यक आहे शिक्षक संघ शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढा देत असून शिक्षकांवर होत असलेला अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. शालाबाह्य कामाच्या विरोधात जिल्हा तसेच राज्यस्तरावर मोठे आंदोलन उभे केले जाईल.
विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगिर म्हणाले कि शाळाबाह्य कामाचा अतिरेक झाला असून याविरोधात मोठे अंदोलन उभे करावे लागणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हाभरातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना बळ देऊन संघटन शक्ती मजबूत करण्यावर जोर दिला जाईल.
जिल्हा संघाचे अध्यक्ष बबन दादा गाडेकर म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या ,प्रमोशन, शालेय पोषण आहार वेगवेगळे मेनू देण्यासंदर्भात निघालेला जाचक जीआर, क्यू आर कोड वरून प्राथमिक शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नोंदवण्याबाबतचे एप्लीकेशन, मिशन आरंभ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाई यांसह अनेक प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. त्याचा परिणाम म्हणून आज जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासंदर्भातही सकारात्मक भूमिका घेतली आहे. या सर्व बाबी घडल्यानंतरही अशैक्षणिक कामे व इतर प्रश्नांबाबत जिल्हा संघ आंदोलनाच्या पावित्र्यावर कायम आहे.
यावेळी सर्वश्री अनिल शिंदे, बाळासाहेब जऱ्हड,चंद्रकांत नरसाळे, गणेश गाडेकर, गहिनीनाथ पिंपळे, चंद्रकांत गट, संदीप होले, रामदास दहिफळे , राजेंद्र ढोले, अश्फाक शेख, कैलास निकम, किशोर शिंदे , सतीश परांडे, रवींद्र रोकडे, बाबा काळघुगे, गोरक्षनाथ आव्हाड, आदिनाथ सातपुते, भाऊसाहेब दातीर, बप्पासाहेब शेळके, प्रशांत शेळके, बापू बोरुडे, जयदीप मोकाटे, संतोष तरटे, राजेंद्र दौंड, भारत कोठुळे, गोरक्षनाथ होडशील, सचिन शिंदे, प्रदीप शेलार, संतोष शिंदे, अनिल भुसारी , बाळू म्हस्के, श्रीधर भागवत खेडकर, मिलिंद खंडीझोड, कांतीलाल दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रकाश नांगरे यांनी केले तर संचालक महेश भनभणे यांनी आभार मानले.