अहमदनगर -जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यत सरासरी 628.7 मि.मी. पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत 140.3 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक 170.8 टक्के तर सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत फक्त 195 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षी या कालावधीत 86.5 टक्के म्हणजे सरासरी 374.8 मि.मी. पावसाची नोंद होती.
यंदाच्या वर्षी मात्र जून महिन्यापासून दमदार पावसास सुरुवात झाली होती. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी 112 टक्के म्हणजे 500.6 मि.मी. पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी 148 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरा दिवसांत रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे राहाता, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडण्यास मदत झाली आहे. शुक्रवारपर्यंत (दि.27 ) जिल्ह्यात सरासरी 628.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नगर : 686, पारनेर : 687.4, श्रीगोंदा : 688, कर्जत : 668, जामखेड : 762, शेवगाव : 704.3, पाथर्डी : 799.6, नेवासा : 496.6, राहुरी : 511.7, संगमनेर : 492.3, अकोले : 772.8, कोपरगाव : 514, श्रीरामपूर : 463, राहाता : 508.7.
सरासरी ठीक आहे पण गावोगावी बघा संगमनेर तालुक्यातील खांबे परिसरात पाऊसच नाही.