नगर : अहमदनगर महानगरपालिका पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत दिनांक 27 डिसेंबर रोजी संपुष्टात आल्याचे पत्र प्राप्त झाले असून राज्य निवडणूक आयोगाने प्रशासक नेमणूक करण्यासाठी शासनाला निर्देश केले आहे. यानुसार सहाय्यक आयुक्त यांनी महापालिका पदाधिकारी कार्यालयामध्ये पत्राद्वारे सांगितले की, महापालिकेची मुदत संपुष्टात आली असून यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा बैठका घेता येणार नाही, यानंतर तातडीने उपमहापौर गणेश भोसले यांनी उपमहापौर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना उपमहापौर पदाचा फलक काढण्याच्या सूचना दिल्यानंतर सकाळी फलक काढण्यात आल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले, यातून उपमहापौर गणेश भोसले यांची राजकीय संवेदनशीलता, प्रगल्भता यामधून दिसून येत आहे, आता मनपा प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.