शिक्षक भारतीचे दिनेश खोसे यांची संचालक पदी निवड..
शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांचे विश्वासु खंदे समर्थक,तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष व अ.जि.प्राथमिक शिक्षक भारतीचे प्रमुख मार्गदर्शक नेते श्री.दिनेश खोसे यांची अ.नगर जि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी काल जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या बोर्ड मिटींगमध्ये बहु मताने निवड करण्यात आली.
दीड वर्षा पुर्वी झालेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुरुमाऊली मंडळ सत्येत आणण्यसाठी दिनेश खोसे यांनी सर्व वस्तीशाळा शिक्षकांना सोबत घेऊन गुरुमाऊली मंडळ सत्येत आणण्यसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते.
परंतु शिक्षक भारतीला आज पर्यंत न्याय मिळाला नव्हता.गेल्या आठवड्यात गुरुमाऊली मंडळात फुट पडुन बारा संचालकांनी मनमानी कारभाराला कंटाळुन सवता सुभा उभा करुन गुरुमाऊली मंडळाचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष राजकुमार साळवे.गुरुमाऊली मंडळाचे तरुण तडफदार अध्यक्ष सुरेशराव निवडुंगे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता परीवर्तन झाले.व नुतन चेअरमण बाळासाहेब सरोदे तर व्हा चेअरमण रमेश गोरे विराजमान झाले.
राजकुमार साळवे व सुरेश निवडुंगे यांनी शिक्षक भारतीला न्याय देऊन श्री दिनेश खोसे यांची अ.नगर जि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड करुन दिलेला शब्द पुरा करुन जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांच्या वाडीवस्तीवर आनंदा द्विगुणित केला.यावेळी वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
या निवडीबद्दल मा.आ.कपिल पाटील राज्याध्यक्ष नवनाथ गेंड व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी व वस्तीशाळा शिक्षकांनी अभिनंदन केले आहे
यावेळी शिक्षक भारतीचे जि.अध्यक्ष मुकेश गडदे महीला जिल्हाध्यक्षा सौ.ऊषाताई येणारे जि.सरचिटणीस सुनिलकुमार मते जि.उपाध्यक्ष वसंत कर्डीले कार्याध्यक्ष संदीप तोरडमल संपर्क प्रमुख दिनकरराव जेवे.जि.उपा.भाऊसाहेब ढाकणे विश्वनाथ महांडुळे.शेवगाव ता.अध्यक्ष संदीप कातकडे बप्पाजी विखे पा.संदीप काळे नानासाहेब बागल जयवंत भापकर बापुराव गिरवले तात्यासाहेब जगताप कैलास लेंभे आशा पालवे कांता वाघमोडे हीराताई गाडे मच्छिंद्र भणगे रोहीदास गावडे धनंजय कारंडे दिलीप रंधे रामदास भोजने किरण शिरोळे हरीभाऊ सहाणे मंगेश भांगरे सुरेश सरगर श्रीम.मंदा भोसले सौ,शोभा वाणी हेमराज जावळे सह शिक्षक भारतीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
मा.आ,कपिल पाटील साहेब राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या प्रेरणेने व जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे शेवटी उशिरा न्याय मिळाला यांचा आनंद आहे,भविष्यात सर्व सभासंदाच्या दृष्टीने हीताचे निर्णय प्रकियेत प्रामाणिक प्रयत्न करुन नेहमी न्यायाच्या भुभिकेत राहील, मी एकटा संचालक झालो नसुन वाडीवस्तीवरील वस्तीशाळा शिक्षक संचालक झाला आहे,यांचे सर्व श्रेय वस्तीशाळा शिक्षकांचे असुन हा शेवटी प्रामाणिक पणाचा विजय वस्तीशाळा शिक्कांच्या स्वाधीन करतो.
श्री.दिनेश खोसे.
नेते,शिक्षक भारती अ.नगर