*मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केली मतमोजणी केंद्रातील व्यवस्थेची पहाणी*
अहमदनगर – 37-अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे दि.४ जुन रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार असून या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.
यावेळी 37 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा, 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिस्त, अरुल कुमार, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र वखार महामंडळ येथे अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणाऱ्या गोदाम क्रमांक १ व गोदाम क्रमांक ३ येथील व्यवस्थेची पाहणी करून मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.
*******
*******