अहमदनगर: विसाव्या वर्षापासून दरवेळी निवडणूक लढवली, पण प्रत्येक वेळी मतदारांनी आस्मान दाखवलं. पण थकला नाही, शेवटी 32 वर्षानंतर निवडणूक पठ्ठ्याने निवडणूक जिंकलीच आणि थेट सरपंच झाला. अहमदनगरच्या अरणगावचे नूतन सरपंच पोपट पुंड यांना तब्बल 32 वर्षांनी सरपंच पद मिळाल आहे. त्यामुळे अवघ्या गावाने जल्लोष केला.
अहमदनगरच्या अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिली निवडणूक लढली होती, मात्र पदरी निराशाच पडली. त्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं. कधी ग्रामपंचायत तर कधी पंचायत समिती निवडणुका लढवल्या. पण तब्बल 32 वर्षे पदरी अपयश पडले. मात्र आज वयाच्या 51 वर्षी त्यांचे निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंचपदी निवडून आले. त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.