नगर : शहरांमधील रस्त्यावरील तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम एम.एस.सी.बी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत असून रस्त्यावर सर्वत्र झाडाच्या फांद्या पसरल्या असल्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी अडचण निर्माण झाली तसेच वाहतूक कोंडी होऊन छोटे-मोठे अपघात होत आहे वारंवार एम एस सी बी अधिकारी कर्मचारी यांना सांगून सुद्धा तोडलेल्या फांद्या उचलण्याचे काम केले जात नाही. महापालिका व एम एस सी बी कार्यालय यांच्या मधील असवादामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज बुरुडगाव रोड परिसरामध्ये एम.एस.सी.बी च्या वतीने झाडाच्या फांद्या कट केल्या त्या रस्त्यावर सर्वत्र पसरल्या असून एम.एस.सी. बी कडून उचलण्याबाबत कोणतीही यंत्राला आली नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला त्यामुळे ट्रॅक्टर मध्ये त्या फांद्या टाकून थेट एम एस सी बी च्या कार्यालयाच्या गेट मध्ये आणून टाकत गांधीगिरी केली. यापुढील काळात जर एम.एस.सी.बी ने तोडलेल्या फांद्या तातडीने न उचलल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये टाकण्यात येतील असा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सागर गोरे आदीसह नागरिक उपस्थित होते.