Tuesday, June 24, 2025

जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी एकनाथ ढाकणे यांची एकमताने निवड

जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी एकनाथ ढाकणे यांची एकमताने निवड

नगर: ग्रामसेवक पतसंस्था अहमदनगर संचालक मंडळाची मासिक सभा संपन्न होऊन त्यामध्ये ग्रामसेवकांचे नेते माजी राज्याध्यक्ष खंबीर नेतृत्व, पतसंस्थेचे अभ्यासक एकनाथ ढाकणे यांची पतसंस्था ग्रामसेवक अहमदनगरच्या तज्ञ संचालक पदी सर्व संचालकाच्या सूचक अनुमोदनाने निवड करण्यात आली.अशी घोषणा ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक सतीश मोटे व मानद सचिव श्यामराव भोसले यांनी सर्वांचे मत जाणून घेऊन निवड झाल्याचे सर्वानुमते जाहीर केले.
*यानंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न होऊन त्यामध्ये 6 जुलै 2024 रोजी गौरव समितीचा कार्यक्रम आणि पतसंस्थेची आमसभा यशस्वी करणे,सभासदांना दीड कोटी रुपये डिव्हिडंड वाटप करणे,गुणवंत पाल्यांचा सन्मान करणे व माननीय ढाकणे साहेब यांचा यथोचित गुणगौरव करणे,त्याचबरोबर सेवानिवृत्त सभासदांचा मान सन्मान करणे आदी विषय चर्चा होऊन मंजूर करण्यात आले व कार्यक्रमाचे नियोजन केले.त्याचबरोबर प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गागरे साहेब यांचा संघटनेच्या व पतसंस्थेच्या वतीने सन्मान केला व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

*याप्रसंगी संघटनेच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन ग्रामसेवकांच्या प्रप्रलंबित समस्यावर तात्काळ चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे.त्यामध्ये प्रामुख्याने निलंबित ग्रामसेवकांना तात्काळ कामावर घेणे,दप्तर तपासणीच्या कामकाजामध्ये बदल करणे,जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामसेवकांना बोलावणे याबाबतचा फेरविचार होणे,आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तात्काळ ग्रामसेवकांना देणे,पुढील दोन दिवसात उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची याचिका दाखल करणे आणि गौरव समितीच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर प्रतिनिधींना समक्ष निवेदन निमंत्रण देणे,ग्रामसेवक पतसंस्थेच्या ठेवीमध्ये वाढ करणे,चेअरमन व व्हाईस चेअरमनची पुढील आठवड्यात निवडणूक लावणे,आदि महत्वपूर्ण पूर्ण विषयावर सखोल चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेले आहे.*
*ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस अशोकराव नरसाळे यांनी निवडणूक प्रक्रिया याद्या प्रसिद्ध करणे व निवडणूक कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती सादर केली.ज्येष्ठ संचालक संदीप लगड यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.श्यामराव भोसले यांनी सभेचे नियोजन केले. याप्रसंगी ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे यांनी सर्वानुमते माझी तज्ञ संचालक निवड केली.त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले आणि पुन्हा नव्या जोमाने उमेदीने ग्रामसेवकासाठी पतसंस्थेसाठी जीवाचं रान करून संघटना चळवळ जिवंत ठेवण्याचे आश्वासन दिले आणि आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे सभासदासाठी धोरणात्मक बाबीसाठी सामूहिक निर्णय घेऊ आणि पतसंस्थेची भरभराट सभासदाचे हितास्तव अविरतपणे कार्य चालू राहील.अशा प्रकारचे ग्वाही दिली.संचालक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन सुनीलराव नागरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज पाटील,दिलीप नागरगोजे,लक्ष्मणराव नांगरे सर्व संचालक यांनी परिश्रम घेतले.सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर यांनी पतसंस्थेच्या प्रगतीबाबत आणि धोरणात्मक निर्णयाबाबत हे सूचित माहिती दिली.*
*यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष सुभाषराव गर्जे,एकनाथराव आंधळे,युवराज पाटील,दिलीप नागरगोजे,सचिन गदादे,वालीबा मुंढे,बाळासाहेब आंब्रे,बबनराव सांगळे,रुबाब पटेल,समीर मनियार,किसनराव भिंगारदे,उद्धवराव जाधोर,सौ.राणी शरद फाटके,महारुद्र बडे,सुनीलराव नागरे, मंगेशराव पुंड,रमेशराव निबे,रामदास गोरे,नितीन गिरी,वसंत थोरात,पतसंस्था वरिष्ठ लिपिक नफीसखान पठाण,महादेव भोसले साहेब(विस्तार अधिकारी) आदी पदाधिकारी,संचालक उपस्थित होते.*
*याप्रसंगी जामखेड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सुभाष शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे याप्रसंगी जाहीर करून त्यांचा यथोचित सन्मान केला व जामखेड तालुका संघटनेला संलग्नता प्रदान केली.असे अशोकराव नरसाळे जिल्हा सरचिटणीस यांनी या ठिकाणी जाहीर केले.*
*सालाबादप्रमाणे वर्ष सातवे ग्रामसेवक प्रबोधन दिंडी साधारणपणे 12 जुलै ते 14 जुलै या दरम्यान वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार दिंडी काढण्याचे संभाव्य निर्णय घेण्यात आला.*

*आसाराम कपिले*
*शेवगाव

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles