Sunday, July 14, 2024

अहमदनगर ब्रेकिंग: मुख्याध्यापिका ५० हजार घेताना एसिबिच्या जाळ्यात

अहमदनगर

तक्रारदार- पुरुष, वय – 55 वर्ष, धंदा सेवानिवृत्त, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर

आरोपी – श्रीमती संगीता नंदलाल पवार, वय 53 वर्ष, मुख्याध्यापिका, वर्ग-2, सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर, जि.अहमदनगर रा. दत्तनगर, पोस्ट टिळक नगर, तालुका
श्रीरामपूर,जि.अहमदनगर

लाचेची मागणी – 50,000/- रुपये

तडजोडी अंती – 45,000/- रुपये

लाच स्विकारली – 45,000/- रुपये

लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक – 12/06/2024

लाचेचे कारण- तक्रारदार यांची पत्नी सौ.सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा शासन अनुदानित आहे. तक्रारदार यांचे पत्नीचा सन 2015 ते 2022 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम 1,62,367/- रुपये मिळाली आहे. तक्रारदार यांचे पत्नीचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात श्रीमती संगीता नंदलाल पवार, मुख्याध्यापिका, सौ.सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर ह्या 50,000/- रुपये लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार ला. प्र. वि. अहमदनगर कडे आज दिनांक 12/06/2024 रोजी प्राप्त झाली होती, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक 12/06/2024 रोजी सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेविका संगीता पवार यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच मागणी करुन तडजोडी अंती 45,000/- रुपये लाच मागणी केली व ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यानुसार आज दि. 12/06/2024 रोजी शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचलित सुभद्रा मुलींचे वसतीगृह, श्रीरामपूर येथे आरोपी लोकसेविका पवार यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेविका पवार यांनी यातील तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष 45,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा अधिकारी- प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर

सापळा पथक – पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, किशोर लाड, वैशाली शिंदे,
चालक हरून शेख

आरोपीचे सक्षम अधिकारी – अध्यक्ष, शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन सोसायटी श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles