Saturday, May 18, 2024

शेतीच्या वादातून पती पत्नीला मारहाण, 5जणांविरूध्द नगर तालुक्यातील घटना…

अहमदनगर -शेतीच्या वादातून पती- पत्नीला कुर्हाड, काठीने मारहाण केल्याची घटना हिवरेबाजार (ता. नगर) शिवारात घडली. मारहाणीत सतिष रामदास ठाणगे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण संजय ठाणगे, संजय विठ्ठल ठाणगे, नितीन विठ्ठल ठाणगे, सुलभा संजय ठाणगे, अंबिका नितीन ठाणगे (सर्व रा. हिवरेबाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २९ एप्रिल रोजी सायंकाळी सतिष त्यांच्या हिवरेबाजार शिवारातील शेतात ट्रॅटरच्या सहाय्याने नांगरट करत असताना तेथे करण आला व म्हणाला, तू येथे नांगरणी का करतो’, तेव्हा सतिष त्याला म्हणाले, क्षेत्र मी खरेदी केले आहे’, याचा राग आल्याने करण याने इतरांना तेथे बोलून घेतले.

त्यांनी सर्वांनी सतिष यांना काठी व कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून सतिष यांची पत्नी विशाखा तेथे आली असता सुलभा व अंबिका यांनी तिला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जखमी सतिष यांनी दिलेल्या जबाबावरून ३० एप्रिल रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार जंबे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles