ह्यूम मेमोरियल चर्च व गाँर्डन हॉल मेमोरियल चर्चचा धर्मदाय उपआयुक्त यांची मान्यता असलेल्या विश्वस्तांनी पोलीस संरक्षणात घेतला ताबा. स्वयंघोषित विश्वस्थानी चर्चाच्या चाव्या न दिल्याने टाळे तोडून केला प्रवेश. अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेगेशनल डी.१८ या चर्च न्यासाच्या धार्मिक कार्यासाठी वहिवाटीतील ह्यूम मेमोरियल चर्च व गाँर्डन हॉल मेमोरियल चर्च ही दोन्ही मंदिरे धर्मादाय उपआयुक्त कार्यालय यांची मान्यता असलेल्या विश्वस्त मंडळाकडे पोलीस संरक्षणामध्ये ताबा देण्यात आला. तथाकथित स्वयंघोषित विश्वस्त व धर्मदाय उपायुक्त यांची मान्यता असलेल्या विश्वस्तां मध्ये न्यायालयीन लढा चालू होता या न्यायालयीन लढा मध्ये मान्यता असलेल्या विश्वस्तांकडे चर्चचे धार्मिक कार्यासाठी मालकी हक्क निकाल देण्यात आला व आज सकाळी ह्यूम मेमोरियल चर्च व गाँर्डन हॉल मेमोरियल चर्च येथे विश्वस्त व सभासद व समाज बांधव एकत्र जमून पोलीस बंदोबस्तात स्वयंघोषित विश्वस्त यांना चर्चच्या चाव्या मागविण्यात आल्या होत्या परंतु चाव्या न दिल्याने मान्यता असलेल्या विश्वस्त मंडळांनी चर्चेचे कुलपे तोडून चर्चमध्ये प्रवेश करत धार्मिक कार्यासाठी ताबा घेत देवाची प्रार्थना केली. यावेळी अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेनेशनल डी १८ चे पदसिद्ध अध्यक्ष रेव्हें.डॉ.सनी मिसाळ, सेक्रेटरी रवींद्र ठोंबरे, खजिनदार विनोद भालेराव, जेस्टविश्वस्त चंद्रकांत उजागरे, विलास साळवे, प्रसाद काळे, प्रा.डॉ. विनय रणनवरे, नंद प्रकाश शिंदे, शाल बनकर, सुधाकर ठोंबरे, संजय मिसाळ, अजय मिसाळ, सुनील शेत्रे, नितीन घोडके, सत्यशील शिंदे, सो.प्राची थोरात, सो.संगीता सोनवणे, विजय सातारकर, जयंत गायकवाड, प्रकाश सूर्यवंशी, सभासद अमोल काळे, राजेश सूर्यवंशी, प्रशांत मिसाळ, बाळासाहेब सूर्यवंशी,