Saturday, January 25, 2025

नगरमधील हृदयद्रावक घटना, कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन

जामखेड तालुक्यातील जातेगावमध्ये वैभव मारूती गायकवाड (वय २३ ) याने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जातेगाव येथील वैभव मारूती गायकवाड हा सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी नाही म्हणून शेती करत होता. शेतीतही कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पन्न मिळत नाही. यामुळे कर्जबाजारी वाढत जातो. यामुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्जेत आहेत यातच ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत. यामधुनच वैभवने आपली जीवनयात्रा संपवली.

वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई वडील, एक भाऊ, बहिण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. घरी पाच एकर जमीन आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. जमीनीवर कर्जही होते.

सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. तरीही आरक्षण नाही. यामुळे नोकरी नाही. यातच अनेक तरुण नैराश्याच्या गर्जेत आहेत.

आज सकाळी वैभव आपल्या रूममध्ये गेला आणी नैराश्यामुळे घर बंद करून घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जातेगाव मध्ये अंत्यसंस्कार केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles