बदलापूर येथील नराधमाला लाईव्ह कॅमेरा सामोर भर चौकात फाशी द्या – स्वप्नील खाडे ..!
बदलापूर येथे एका शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. विविध पक्ष आणि संघटनांद्वारे या घटनेबाबत निषेध व्यक्त करून आंदोलन, निदर्शने करण्यात येतं आहेःत , जामखेड तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी नराधमाला लाईव्ह कॅमेरा सामोर भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी जामखेड येथिल तहसीलदार यांना केली
निवेदनात म्हटले आहे की दि. १३/०८/२०२४ रोजी बदलापूर येथील खाजगी शाळेमध्ये ४ आणि ६ वर्षाच्या चिमुकलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने अत्याचार केला. पिडीत मुलींने काही दिवसानंतर ही घटना व त्रास सांगितल्याच्या नंतर चिमुकलीच्या गर्भवती आईला गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल ११ तास पोलीस ठाण्यात थांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतक्या संवेदनशील घटनेवर प्रशासनाचा एवढा हलगर्जीपणा व कोणतेही गांभीर्य नसणे हे महाराष्ट्राच्या विकृत झालेल्या मनिपूरचे दर्शन वाटते. सरकारे येतात, सरकारे जातात लोकप्रतिनीधी जात-धर्म समुदाय आरोप प्रत्यारोप यावरतीच व्यस्त होवून निवडणूकांचे भांडवल करताना दिसतात. आपण राष्ट्राला देश म्हणतो पण माझ्या राज्याला महाराष्ट्र म्हणतो. राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी होळकर छत्रपती शिवाजी महाराज, शाहु-फुले-आंबेडकर संविधानाने नटलेल्या महाराष्ट्राची मनिपुर राज्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. महिला युवती सुरक्षीत नाहीतच तर लहान मुले सुद्धा नराधमांची शिकार ठरत आहे. या गोष्टीला व कायदा सुव्यवस्था व महाराष्ट्राची संवेदना संपविण्याला जबाबदार कोण ? तसेच कोलकत्ता येथील डॉ. तरूणीवर झालेल्या अत्याचार, मनिपूर येथे झालेली घटना भारतमातेच्या काळजावर ताजी असताना बदलापूर घटनेने महाराष्ट्राला काळींबा फासलां, शासनाने पालक आणि विद्यार्थी मग शाळा खाजगी असो या सरकारी सी.सी.टि.व्ही कॅमरे व पालकांना आपल्या मुलांना पाहता येईल अशा अॅपची निर्मिती करून आमलात आणावे.
तसेच बदलापूर घटनेतील नराधम याला पोलीसांनी अटक केलेली आहे, मी एक नागरीक म्हणून निवेदन करतो की, जर एका रात्रीमध्ये देशाच्या चलनव्यवस्थेतील नोटा बंद करू शकतात, काही मिनिटात । सरकारसुद्धा बदलु शकतात. अजून अक्षम्य शक्ती असलेल्या देशात बलात्कार करणाऱ्या नराधमाला तातडीने भरचौकामध्ये इन लाईव्ह फाशी देण्याचे काम सरकारने करावे. तसेच येथुन पुढे असे कृत्य करणाऱ्या नराधमास कठोर शासन करून फाशीची शिक्षा द्यावी.
असे निवेदनात स्वप्नील खाडे यांनी म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे