आ . प्रा.राम शिंदे, आ रोहित पवार, प्रा मधुकर राळेभात हे तीन स्पर्धक सिताराम गडावर एकत्र
धार्मिक ठिकाणी राजकीय भाष्य टाळले .
. जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – जामखेड कर्जत मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येत आहे. विधानसभेत उमेदवार म्हणून जनतेच्या चर्चेत असलेले आ प्रा राम शिंदे, आ रोहित पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर राळेभात हे तीनही एकमेकांचे स्पर्धक दि ८ सप्टेंबर रोजी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सिताराम गडावर सिध्दसंत श्री सिताराम बाबा यांच्या दशम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री चतुर्भुज विष्णू मूर्ती, श्री सद्गुरु सिताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व सुवर्णकलश वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात या तीन दिग्गजांची एकत्र उपस्थिती होती.
यावेळी कोण काय राजकीय भाष्य करतय हे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा नागरिकांच्या मनात होती. मात्र तिघांनीही राजकीय उण्यादुण्यावर बोलणे टाळले.
यावेळी आ. राम शिंदे म्हणाले की, सितारामगड हे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. मी मंत्री असताना गडासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या ठिकाणी आलेला माणूस काहीतरी दिल्याशिवाय जात नाही या गडाचे पवित्र राखण्याचे काम भक्तगणांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा मधुकर राळेभात म्हणाले की खर्डा या गावचा इतिहास जुना आहे. की गितेबाबा मठ व सितारामगड हे प्रेरणास्रोत असून यांचे नाव दमादमाने एके दिवशी देशाच्या नकाशावर जाईल. यावेळी
काल्याची दहीहंडी महालिंग महाराज नगरे, आ. रोहित पवार व आ.राम शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आली.
यावेळी आ रोहित पवार म्हणाले की
सिताराम गड धार्मिक शक्तीपीठ असून या ठिकाणी आल्यानंतर काम करण्याची ऊर्जा निर्माण होते.
आ.पवार बोलताना पुढे म्हणाले की, सिताराम गडासाठी ३कोटीचा तर गीतेबाबा देवस्थानाला ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पुढील काळातही सिताराम गडाला भरीव निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले .
रोहित पवारांनी नामोल्लेख टाळल
यावेळी बोलतांना आ. रोहित पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे नाव घेतांना प्रा मधुकर राळेभात यांचा नामोल्लेख टाळला. नूकतेच काही दिवसांपूर्वी मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व आ रोहित पवार यांची साथ सोडल्याचे जाहीर केले आहे. आ. रोहित पवार यांच्यामध्ये एकाधिकारशाही, हुकूमशाही, मीपणा आहे असे आरोप मधुकर राळेभात यांनी केले होते.याची मतदारसंघात मोठी चर्चा झाली. मधुकर राळेभात यांचा जामखेड कर्जत मतदारसंघात सध्या स्वाभिमानी संवाद यात्रा चालू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाढत क्रेज वाढत आहे. म्हणूनच कार्यक्रमात आ रोहित पवार यांनी मधुकर राळेभात यांचा नामोल्लेख टाळला आहे अशी नागरिकांमधून चर्चा ऐकायला मिळत आहे.