Sunday, December 8, 2024

जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ शिक्षकांवर होणार कारवाई, शिक्षक विभागाने दिला हा इशारा

नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई
८९ शिक्षक आले बदलून : जिल्ह्यात रिक्त जागांंवर पदस्थापना
अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून इतर जिल्ह्यांत अडकून पडलेले व आता आंतरजिल्हा बदलीने नगर जिल्ह्यात बदलून आलेल्या

८९ शिक्षकांना शिक्षण विभागाने आठ दिवसांपूर्वी समुपदेशन करून नियुक्त्या दिल्या. मात्र अजूनही काही शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. अशा शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातील ३९४३ शिक्षकांच्या ॲानलाईन आंतरजिल्हा बदल्या ॲागस्ट २०२२ मध्ये झाल्या. यात इतर जिल्ह्यांतून २६५ शिक्षकांच्या बदल्या नगर जिल्ह्यात झाल्या. विहीत मुदतीत केवळ १७६ शिक्षक हजर झाले. त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन करून जिल्ह्यात नियुक्त्या दिल्या गेल्या. परंतु ८९ शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नव्हते. बदल्यानंतर शिक्षकांच्या १० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त राहत असतील तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी अशा शिक्षकांना कार्यमुक्त करत नाहीत. असेच हे ८९ शिक्षक गेल्या वर्षभरापासून बदली होऊनही अडकले होते. आता त्यांना कार्यमुक्त केले गेल्याने हे ८९ शिक्षक स्वगृही म्हणजे नगर जिल्ह्यात बदलून आले.

या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दि. २८ जून रोजी समुपदेशनाने पदस्थापना दिली गेली. यात संवर्ग १, संवर्ग २मधील शिक्षकांचाही विचार झाला. जेथे रिक्त जागा असतील तेथे त्यांना नियुक्ती दिली गेली व दोन दिवसांत नियुक्त शाळेत हजर होण्यास सांगितले. परंतु अजूनही अनेक शिक्षक हजर झालेले नाहीत. त्यामुळे जे शिक्षक वेळेत हजर होणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

Related Articles

2 COMMENTS

  1. हजर न झालेल्यांवर प्रशासकीय कारवाई करणार अशी बातमी आपण छापली पण ते लोकं हजर का झाले नाहीत याची पण माहिती घ्या….अगदी दडपशाहीने पदस्थापना दिल्या आहेत…सर्वच शिक्षक बदलीकरून पस्तावले आहेत..प्रशासनाने अशी भूमिका का घेतली..शिक्षकांवर अन्याय का केला याचा पण शोध घ्यावा…

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles