Saturday, April 26, 2025

नगरमधील शिक्षकांचे बनावट अपंग प्रमाणपत्र,आंतर जिल्हा बदली विरोधात थेट पोलिसात तक्रार!

अहमदनगर (प्रतिनिधी) – आंतरजिल्हा बदलीसाठी संवर्ग एक मधून खोटे जास्त घटस्फोट व खोटे अपंग प्रमाणपत्र सादर करून अर्ज केल्याचे विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे सदर अर्जावर तक्रारदाराचे नाव नाही मात्र सही आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची पोहोच प्राप्त असलेले हे अर्धा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे ज्यांनी खोटे घटस्फोट घेऊन अर्ज केले अशा लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी घटस्फोट घेतला त्यांनी बदलीसाठी अर्ज करताना आपल्या माहेरकडची गावे निवडणे ऐवजी सासरकडची गावी निवडली आहेत हे विशेष.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे कि
आंतरजिल्हा बदली मध्ये संवर्ग एक अंतर्गत खोटे दाखले देऊन तसेच घटस्फोटीत दाखवून शासकीय बदलीचा फायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली सन 2017 व 2022 करिता शासन धोरणामध्ये संवर्ग एक यांना विशेष प्राधान्य देण्यात येते.या गोष्टीचा फायदा घेऊन काही शिक्षकांनी त्यांच्या पत्नीचा घटस्फोट न्यायालयातून दाखवण्यापुरता घेतला व शासकीय बदली धोरणाचा वापर करून घेतला,तसेच काही शिक्षकांनी अपंगत्वाचे दाखले खोटे सादर केले आहेत.
संवर्ग एक मधून बदली झालेल्या घटस्फोटीत महिलांचे सी डी आर कॉल रेकॉर्ड तपासल्यास आपणास सर्व काही सत्य समोर येईल. तसेच ज्यांनी अपंगात्वाची दाखले दिलेले आहेत त्यांचे खरे का खोटे हे उघड होईल.विशेष म्हणजे घटस्फोटीत महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या माहेरील जिल्हा, तालुका न निवडता त्यांच्या पतीचा तालुका निवडला ही बाब विशेष आहे.
शिक्षकी पेशांमधील शिक्षकांनी अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणे योग्य नाही, बहुतेक या शिक्षकांना असे दाखवून द्यायचे आहे कि आपण खोटे कागदपत्रे करून शासनाची फसवणूक सहज करू शकतो.याचे उदाहरणच त्यांनी विद्याथ्यांपुढे ठेवले ही अत्यंत गांभीर्याची बाब आहे.

तरी अंतर जिल्हा बदली मध्ये सन 2017 व 2022 संवर्ग एक मधून बदली झालेला व ज्यांनी खोटी माहिती दिली अशा शिक्षकांची तपासणी करून फसवणुकी अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अन्यथा सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदलीमध्येही सर्रास शिक्षक खोटे घटस्फोट दाखले,दिव्यांग दाखले जोडतील.परिणामी प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकाला बदलीपासून वंचित राहावे लागेल.
सोबतः संवर्ग एक मधून बदली प्राप्त शिक्षकांची यादी जोडली आहे.या निवेदनाच्या प्रती
आमदार प्रशांत बंब,गंगापूर,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,अजित दादा पवार उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान घटस्फोटीतचे खोटे दाखले घेऊन तसेच परीतक्त्या असल्याचे दाखवून मागील काळात काही शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली सुद्धा करून घेतली असल्याचे समजते.या कामी त्यांना जिल्ह्यातील काही तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
काही शिक्षकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केल्याचेही चर्चिले जात आहे. याबाबत सोशल मीडियावर सुद्धा जाहीर चर्चा होत आहे.ज्यांनी कोणताही संवर्ग न घेता खुल्या गटातून अर्ज केले आहेत त्या लोकांना आपली बदली होणार नाही अशी भीती वाटत आहे.त्यामुळे त्यांनी असे खोटे दाखले सादर करणारे शिक्षक,
शिक्षिका शोधून त्यांच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गात खळबळ उडाली असून ज्यांनी अर्ज केले ते हवालदिल झाले आहेत.
संबंधित यादीतील ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत अशा शिक्षकांच्या अर्जाची व त्यांच्या पुराव्याची शहानिशा झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येऊ नये अशी मागणी आता करण्यात आली आहे.
प्रशासनाची डोकेदुखी वाढली
येन केन प्रकारे बदली होण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळे मार्ग अवलंबिले आहे.
घटस्फोटीत असल्याचे खोटे दाखले तयार केले आहेत तसेच परीतक्त्या असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे.शिवाय अपंगत्वाचे खोटे दाखले दिल्याचा मुद्दा देखील चर्चेत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे. कारण तक्रार अर्ज आल्यानंतर त्याची चौकशी करणे भाग असते.यामध्ये शिक्षण विभागातील काही डोकेबाज कर्मचारी व अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन या प्रश्नातून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.मध्यंतरी झालेल्या प्रमोशनमध्ये काही शिक्षकांनी हिंदी विषयाच्या खोट्या डिग्र्या सादर करून शासनाचा लाभ घेतल्याची बाब उघड झाली आहे. त्या विरोधात आता थेट शिक्षण आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून सदरचे प्रकरण चौकशीसाठी लवकरच जिल्हा परिषदेकडे येणार आहे.प्रशासन एकीकडे बदल्यांबाबत जागरूक असतांना व अतिशय पारदर्शकपणे कोणावरही अन्याय न करता काम करण्याचा प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे अशा तक्रारीमुळे मात्र प्रशासनाला काम करणे अवघड झाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles