महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ स्थानिकांनी लावलेला एक फलक वादग्रस्त ठरला आहे. घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये, अशा सूचना लिहिलेला एक फलक सुळक्याच्या पायथ्याला लावण्यात आला आहे. येथे नियमित येणाऱ्या काही गिर्यारोहकांनी सोशल मीडियात नाराजी व्यक्त केल्याने याची चर्चा सुरू झाली. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.https://x.com/ChakankarSpeaks/status/1775117229304246382?s=20
- Advertisement -