Tuesday, May 28, 2024

अहमदनगर – कल्याण रोडवर भीषण अपघात, चिमुकलीचा मृत्यू; ३ जखमी

अहमदनगर – कल्याण रोडवर कर्जुले हद्दीमध्ये पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर- कल्याण रोडवर आज पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी ही बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles