Wednesday, April 17, 2024

मोदींच्या पुढच्या मंत्रिमंडळात सुजय विखे मंत्री होणार, फक्त आम्हाला विसरू नका, कर्डिलेंची जोरदार बॅटिंग

खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जामखेड काँक्रिटीकरण रस्त्यासाठी 657 कोटी रुपये मंजूर झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात खा.डॉ. सुजय विखे पाटील मंत्री होणार आहे. लोकसभेची निवडणूक लढवणे ही सोपी गोष्ट नाही मी सुद्धा निवडणूक लढवली होती त्यामध्ये माझा पराभव झाला होता. लोकसभा निवडणूक फक्त विखे कुटुंबियांनीच. सुजय विखे पाटील मंत्री झाल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका म्हणजे झालं असे परखड मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नेप्ती उप बाजार समिती आवारातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप,युवा नेते अक्षय कर्डिले,विनायक देशमुख, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, हमालपंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले ,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुका अध्यक्ष दीपक कार्ले, संचलक संतोष म्हस्के,अभिलाष घिगे,रेवण चोभे ,सुभास निमसे ,सुधीर भापकर,सचिव अभय भिसे ,सचिन सातपुते,विशाल पवार,दत्ता तापकिरे,भाऊसाहेब ठोंबे,संजय गिरवले,भाऊ भोर गुरुजी,धर्मनाथ आव्हाड,मधुकर मगर,राजू आंबेकर,मंजाबापू घोरपडे,रामदास सोनावणे,राजेंद्र बोथरा,निलेश सातपुते आदींसह संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles