बुर्हानगर येथे सलगीचा संवाद करीत कर्डिले परिवाराचा स्नेहबंध
ग्रामीण महिलांची हितगुज करीत स्नेहभोजनाचे आयोजन
कर्डिले कुटुंबीयांचा जनसेवेचा वारसा अखंडितपणे सुरू
अहमदनगर प्रतिनिधी : तीस वर्षापासून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण शेतकरी वर्गाच्या सुख दुःख सोबत राहून मने जिंकण्याचे काम केले आहेत. वर्षभरात येणारे सण उत्सव धार्मिक कार्यक्रमानिमित्त कर्डिले यांचा लोकसंवाद सुरूच असतो तिळातील स्नेहाचे व नात्यातील गोडवा याचे दायित्व जपण्यासाठी महिलांसाठी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून स्नेहमेळावा करीत कर्डिले परिवाराने ऋणानुबंध जोडले आहे या कार्यक्रमामध्ये सुमारे पाच हजार महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली या स्नेहभोजनाचा संक्रातीचे वान सन्मान पूर्वक महिलाना देण्यात आला. समाजसेवेचा कर्डिले यांचा हा वारसा जपण्यासाठी कर्डिले यांच्या सुनबाई प्रियंका अक्षय कर्डिले याही या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन महिलांशी संवाद साधीत विचारपूस करीत होत्या
बुर्हानगर येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले परिवाराच्यावतीने हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अलकाताई कर्डिले व प्रियंका कर्डिले यांनी सवाष्णींना हळदी कुंकू लावून तिळगुळ व वांनवसाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.
अलकाताई कर्डिले म्हणाले की दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नगर राहुरी पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यातील महिलांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मकर संक्रांतीनिमित्त पूर्वजांनी घालून दिलेली आपली संस्कृती व परंपरा जोपासण्याचे काम आपण सर्वजण करीत आहेत आजच्या युवा पिढीला आपल्या महान संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हळदी कुंकाचे कार्यक्रमाचे आयोजन करीत असते सर्व जाती धर्मातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित लावली.