सख्ख्या चुलत भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.राक्षसवाडी बुद्रुक येथील विकास दिलीप शिंदे (रा. राक्षसवाडी बुद्रुक, वय ३०)असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पप्पू शांतीलाल शिंदे (रा. बेलवंडी) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक व कर्जत पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पप्पू शिंदे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.