Tuesday, May 28, 2024

विरोधकांनी निवडणूक खालच्या पातळीवर नेलीय, मतदार त्यांना जागा दाखवतील…खा.विखेंचा विश्वास

कर्जत । प्रतिनिधी

ही देशाची निवडणूक असून देशाचा पंतप्रधान ठरविणारी निवडणूक आहे यामुळे शेवटचा मतदार महत्वाचा आहे. त्यापर्यंत पंतप्रधान मोदींचे कार्य पोहचवा असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान मोदींनी राबविलेल्या योजनेचा लाभ सर्व घटकांना झाला आहे. यामुळे देशातील लोकांच्या मनात मोदीच आहेत. आपल्याला फक्त मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहचवायचे आहे. असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. ते कर्जत येथील गाव भेट दौऱ्यादरम्यान बोलत होते.

अहिल्यानगर लोकसभेची निवडणूक अतिंम टप्प्यात आली असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ.सुजय विखे यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली आहे. गावो गावी भेटी देऊन, ते लोकांना देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच योग्य पर्याय असल्याचे मतदारांना समजावून सांगत आहेत. विकास कामाच्या मुद्यावर त्यांनी आपल्या प्रचार कायम ठेवला आहे. कर्जत तालूक्यातील *माळंदी* येथील गावात महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह आमदार प्रा. राम शिंदे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा. डॉ. विखे म्हणाले की, सदरची निवडणूक विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर आणली आहे. विकास कामा व्यतिरिक्त इतर सर्व मुद्यांवर ते काम करत आहेत. कारण त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही. केवळ आरोप करून निवडणूकीत प्रसिद्धी मिळवण्याचे काम त्यांनी चालवले आहे. यामुळे जनतेची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. १३ मे रोजी त्यांना मतदार आपली जागा दाखवतील टोला हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने दोन पर्वात देशात असंख्य विकास कामे केली आहे. मागील १० वर्षात देशात झालेला विकास जनतेला माहित आहे. यामुळे मोदींच्या हमीवर लोकांचा विश्वास आहे. यामुळे आपल्याला केवळ मतदानाचा टक्का वाढवून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचे आहे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राम शिंदे म्हणाले की, डॉ. सुजय विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिलेदार असून त्यांना विजयी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. आपला विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
०००००

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles