नगर – केडगाव उपनगरातील अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि.२४) सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दुपारी उशिरा पर्यंत त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 नागरिक जखमी झाले आहेत.तब्बल ७ तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले.
केडगाव, अंबिकानगर भागात बिबट्या आल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक दिलीप सातपुते, मनोज कोतकर, अमोल येवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना दिलासा देत शासकीय यंत्रणा, पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Ahmednagar केडगाव परिसरात बिबट्याचा धुमाकुळ, हल्ल्यात 3 जखमी ७ तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश
- Advertisement -