नगर शहरातील केडगाव परिसरातील अंबिकानगर भागात बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. केडगावातील अंबिकानगर परिसरात बिबट्या आढळला. या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. मात्र हा व्यक्ती बिबट्याच्या तावडीतून निसटला. परंतु, हा व्यक्ती बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी हा बिबट्या अंबिकानगर भागात काही लोकांना दिसला. लागलीच ही बातमी सगळीकडे पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती लोकांनी वनविभागाला दिली. यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
Ahmednagar केडगाव परिसरात बिबट्याचा धुमाकुळ, हल्ल्यात एक जखमी
- Advertisement -