Wednesday, February 12, 2025

केडगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ

केडगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ

प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामाबद्दल जागृती होणे आवश्‍यक-नगरसेवक मनोज कोतकर

अहमदनगर प्रतिनिधी-अहमदनगर पालिकेच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 6या दरम्यान स्वच्छता पांढरा साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आज केडगाव येथील सरस्वती माध्यमिक ,उच्च माध्यमिक विद्यालय च्या वतीने केडगाव परिसरात स्वच्छता करण्यात आली.दरवर्षी विद्यालयाच्या वतीने केडगाव देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असते.केडगाव मध्ये दर्शना साठी येणाऱ्या देवी भक्ता साठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.मंदिर परिसर स्वच्छ केला. मा नगरसेवक मनोज कोतकर यांनी विध्यार्थ्यांना स्वच्छतेचि शपथ दिली.विघटन न होणारा प्लास्टिकचा कचरा सर्वात धोकादायक बनत चालला आहे. इतर कचऱ्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावणे अवघड असून, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामाबद्दल जागृती होणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छतेसाठी घेतलेला पुढाकार हा रोगराई मुक्तीकडे वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व ग्रामस्थांना अस्वच्छता व प्लास्टिक कचऱ्याचे धोके सांगण्यात आले. उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृक राहण्याचे, घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देणार नाही आणि आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची व प्लास्टिक मुक्ततेची शपथ घेतली.
यावेळी उपस्थित मा नगरसेवक मनोज कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, अविनाश साठे,शिवाजी मगर
सर्व शिक्षक,कर्मचारी, विध्यार्थी,परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles