नगर – कायनेटिक चौकाचा राजा मित्र मंडळाच्यावतीने वाजत-गाजत मिरवणुकीने श्री गणेशाचे आगमन झाले. मल्हार चौक येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी.खानदेश व माजी महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते आरती करुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेविका विद्या खैरे, दिपक खैरे, मंडळाचे मार्गदर्शक पै.युवराज खैरे, मंडळाचे अध्यक्ष आनंत्रे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, अशोक आगरकर, फुलसौंदर, कविटकर, उल्हास मुळे, शशि नांगरे, घोरपडे, बार्शीकर, वाघमारे, विशाल गायकवाड, अनुज वर्मा, दिपक लोंढे, बंट्टी जाधव, अशोक धुमाळ, अवि मेटे, सागर सोबले, राहुल शिरसाठी, कृष्णा खैरे, साहिल आव्हाड, प्रतिक आव्हाड, तेजल आव्हाड, शुभम जगताप, विशाल चव्हाण, मयुर घोलप आदिंसह भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी युवराज खैरे म्हणाले, श्री गणेशाची प्रतिक्षा सर्वांनाच असते. यंदाच्यावर्षीही श्री गणेशाचे सर्व उत्साहात आणि धुमधडक्यात स्वागत होत आहे. येथील कायनेटिक चौकाचा राजा मंडळाच्यावतीने यंदाच्या वर्षी ‘महादेवरुपी श्री गणेशा’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला मोठ्या उत्साहात, वाजत-गजात मिरवणुक काढण्यात आली. ढोल पथक, फटाक्यांच्या अतिषबाजीत व असंख्य भाविक सहभागी झाले आहेत. या श्रीगणेशाचे परिसरातून पूजन करुन स्वागत करण्यात आले. मंगळवारी प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, 10 दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या कार्यात सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी होत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष के.डी.खानदेशी, माजी महापौर सुरेखा कदम आदिंनीही मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करुन श्री गणेश चरणी प्रार्थना करण्यात आली. माजी नगरसेवक दिपक खैरे यांनी सर्वांचे स्वागत केले.