के.के.रेंजसाठी भूसंपादन करण्यास राज्य सरकारची असमर्थता -खा.डॉ विखे
भिंगार छावणी परीसराचा सहा महिन्यात महापालिकेत होणार समावेश
केंद्रीय संरक्षण सचिवांसमवेत जिल्ह्यातील प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)
के. के.रेंज साठी होऊ घातलेल्या जमिनीचे अधीग्रहण करण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवली असल्याची खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली..
या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्यासह संरक्षण विभागाचे आणि छावणी परिषद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यां समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी बैठकीत के.के.रेंजचा प्रश्न प्राधान्याने मांडून शेतकऱ्यांच्या जमीनीचे अधिग्रहण करण्यास राज्य सरकारच्या महसूल विभागाने असमर्थता दर्शवली सदर बैठकीत त्यांनी केंद्राचे संरक्षण सचिव गिरीधर असमाने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खा.डॉ सुजय विखे पाटील नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे उपस्थित होते.
राज्य सरकारच जमीनीचे अधिग्रहण करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल असे विखे पाटील म्हणाले.