Tuesday, May 28, 2024

Ahmednagar… विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर दलित तरूणाची आत्महत्या…

नगर : विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्यामुळे एका दलित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने बुधवारी रात्री तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाजवळच हरणवस्ती येथे राहणारा तरुण नितीन शिंदे हा तमाशा सुरू असताना व्यासपीठाजवळ नाचत होता. त्यास हरकत घेऊन काही जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे तमाशात गोंधळ उडाला. काही जणांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. परंतु गोंधळामुळे तमाशा बंद पडला. त्यानंतर शिंदे घरी जात असताना त्याला विवस्त्र करत मारहाण झाली. त्याचा मोबाइलही काढून घेतला. सकाळी त्याने घरी निरोप पाठवला. त्याचे नातलग कपडे घेऊन आले व त्याला घरी नेले. गुरुवारी दुपारी नितीनने घरातच आत्महत्या केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles