Wednesday, April 17, 2024

सैनिक पतीने डोक्यात हातोडा घालून पत्नीची हत्या,अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर-पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात घडली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पूजाने आजच शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन फोटो काढला आणि तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला. पूजा अरुण दाभाडे (वय २६) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलात असलेल्या आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा अरुण दाभाडे हीचे माहेर कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा असून सासर शहरातील टिळेकर वस्ती येथील आहे. पूजाचा पती आरोपी अरुण रतन दाभाडे हा भारतीय सैन्य दलात मणिपूर येथे कार्यरत होता. मात्र त्याची बदली चंदीगड येथे झाल्याने त्याला काही दिवस सुट्टी मिळाली होती आणि त्या निमित्ताने तो कोपरगावला आला होता. पूजा सध्या आपल्या दोन मुलांसह माहेरी जेऊर पाटोद्याला राहत होती आणि शहरातील आचारी हॉस्पिटल येथे गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होती. आज शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांना फोटो काढायला सांगितला. तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला. अरुणने यापूर्वी देखील पूजावर कोयत्याने वार केले होते. त्यावेळेस देखील तिला ३२ टाके पडले होते. मात्र अरुणने आज रागाच्या भरात पूजाला गाठून तिचा काटा काढला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles