अहमदनगर : कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून 28 वर्षीय सोहेल हारून पटेल या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. काल रात्रीच्या सुमारास सोहेल याचे अपहरण करत आरोपींकडून जबरी मारहाण केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबीयांनी केला आहे.
त्यानंतर या आरोपींनी सोहेलला जबर मारहाण केल्याने या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर सोहेलच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस ठाण्यासमोरचं ठिय्या आंदोलन केले.आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण
हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडत विविध आरोप केले. ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले आहेत.एकंदरीत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस