Tuesday, February 18, 2025

पारनेर, श्रीगोंदा, कर्जतला कुकडीचे उन्हाळी आवर्तन…. पालकमंत्री विखे पाटील…

नगर दि.३० प्रतिनिधी

जिल्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतक-यांची मागणी लक्षात घेवून कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हााळी हंगामातील दुसरे आवर्तन आज दि.३० मे पासून सुरू होणार असल्या ची माहिती महसूल तथा जिल्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

कुकडीच्या आवर्तनाबाबत यापुर्वीच आवर्तनाच्या नियोजना संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकी मध्ये आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र अ‍हिल्याानगर मधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई तसेच पिण्यारच्या पाण्यांसाठी अहिल्या नगर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पिण्याईच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याण्या बाबत तातडीने निर्णय करण्यााच्या सुचना दिल्या.

सद्यपरिस्थितीत कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून, डाव्या कालव्याचे आवर्तन करण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणे आवश्याक होते त्या‍नुसार २५ मे पासून पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव मध्ये पाणी घेण्यात येत असून, आवर्तनाच्या आज झालेल्यात निर्णयानुसार कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन गुरूवार दि.३० मे पासून सुरू करण्यााचा निर्णय घेण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. उन्हााची तिव्रता लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्याचे अवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles