नगर अर्बन बँकेच्या संतप्त ठेवीदारांनी आज नगर शहरातील नवी पेठेतील नगर अर्बन बँकेच्या शाखेत कार्यालयात जाऊन दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचा फोटो काढून रस्त्यावर आणून चपलांचा मार देत फोडलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नगर अर्बन बँकेचे ठेविदार ठेवीची रक्कम परत मिळवण्यासाठी आक्रमक झालेले असून नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी याआधी केलेले आसूड आंदोलन देखील संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आलेले होते.
दीडशे कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणामुळे नगर अर्बन बँक अवसायनात गेलेली असून या ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी बँकेत अडकलेल्या आहेत. ठेविदारांनी आत्तापर्यंत वारंवार आंदोलने केली मात्र केवळ आश्वासनापलीकडे त्यांना काहीही दिलासा देणारी बातमी अद्यापपर्यंत आलेली नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी चर्चा देखील केली आणि त्यानंतर संतप्त ठेवीदारांनी बँकेकडे मोर्चा वळवत दिलीप गांधी यांचा फोटो बँकेतून काढून एका खांबावर आणून चपलांचा मार देत फोडला. स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या कार्यकाळात बँकेला बुडवणाऱ्या संचालकांचा धिक्कार असो . बँकेत यांचा फोटो ठेवण्याच्या लायकीचे दिलीप गांधी नाहीत , ‘ असा देखील संताप ठेवीदारांनी व्यक्त केलेला आहे